‘जिंदगी,जान उसके बाद काम’ मनोरंजन क्षेत्राचा राज्य सरकारला पाठिंबा राज्यात लागणार लॉकडाऊन ?

0

राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा विस्फोट होत असून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे.दिवसाला साधारण 40000च्या वर रुग्ण वाढत आहेत, दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत नियम पाळण्याची कळकळीची विनंती केली होती.तसेच प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण सर्वचजण झटत असून स्वयंशिस्त पाळण्याची निकडीची गरज आहे असही ते म्हणाले होते.परंतु लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने साथ वेगाने पसरत असून आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा तसेच इतर यंत्रणा यावरील ताण वाढत आहे.कुटुंबच्या कुटुंब कोरोनाने बाधित होत असून रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढत आहे,त्यामुळे व्हेंटिलेटर्सची गरज भासत आहे.अशा परिस्थितीत लॉकडाऊन लावण्याचा प्रशासन आग्रह धरत असून काही वर्ग मात्र लॉकडाऊनला विरोध करत आहे.राज्यात संचार बंदी वाढवण्यात आली आहे तसेच गर्दी टाळण्यासाठी निर्बंधही वाढवण्यात आले आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्व स्तरावर चर्चा करत आहेत.

दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिनांक 3 रोजी वर्षा या निवासस्थानातून मराठी नाट्य निर्माता तसेच राज्यातील मल्टीप्लेक्स तसेच लहान चित्रपटगृह चालक – मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीतून चर्चा करत संवाद साधला.ही चर्चा दोन सत्रात झाली.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री अनिल देशमुख,मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास उपस्थित होते.पहिल्या सत्रात मनोरंजन क्षेत्रातील आदेश बांदेकर,सुबोध भावे, उमेश कामथ,प्रसाद कांबळी तसेच इतर मान्यवर उपस्थित राहिले होते.यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अनिल देशमुख म्हणाले,मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट व्यवसायातील लोकांच्या अडचणी निर्बंधामुळे वाढणार आहेत,परंतु वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात काही कडक निर्बंध लावण गरजेच ठरल आहे.यासर्व स्थितीत मान्यवरांनी दिलेल्या सूचनांचा जरूर विचार केला जाईल.दुसर्या सत्रात चित्रपटगृह चालक – मालक संघटनांच्यावतीने रोहीत शेट्टी,कमल गियानचंदानी, अजय बिजली, आलोक टंडन इ. मान्यवर उपस्थित राहीले होते.या सर्वांबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असता सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भावनिक साद घालत तुमच्या व्यवसायाविषयी आस्था असल्यामुळेच तुमच्याशी संवाद साधत सहकार्याची अपेक्षा धरत आहे, असे सांगितले.परिस्थिती बिकट असली तरी कोणाही अपराधबोध होऊ नये.कोणालाही दोष देण्याची ही वेळ नसून प्राप्त परिस्थितीतीतून मार्ग काढण्याची गरज आहे. आपण आरोग्य सुविधा वाढवण्याबरोबरच टेलीआयसीयूसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.राज्यात चोवीस ते पंचवीस कोटी लसींची मात्रा असून केंद्राला अजून लसीचा पुरवठा करावा लागणार आहे.नुकसान संपूर्ण राज्यात होणार असून ‘जिंदगी, जान उसके बाद काम’ याप्रमाणे पुढे जावे लागेल असही ते म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.