देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर युवासेनेची मोहिम, खुद्द वरुण सरदेसाई नागपुरात!

0

महाराष्ट्रातील जिवलग मित्र असणारे सेना-भाजप आज एक दिवस एकमेकांच्या विरोधात बोलल्या शिवाय दिवस जात नाही इतके एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. एकमेकांची जमेल त्या प्रकारे धोबीपछाड करण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्ष दिसून येतात. शिवसेना पक्षाच्या विस्ताराच्या हेतूने वरुण सरदेसाई नागपुरात गेल्याने चांगलीच राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपुर मध्ये युवा सेनेचा आजपासून संपर्क सुरु झालाय. नागपूरमध्ये जाऊन त्यांनी विरोधी पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहेच सोबतच माध्यमांशी बोलत असताना शिवसेना नेते वरून सरदेसाई म्हणाले की “महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाछी ED, CBI हा विरोधकांचा शेवटचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकार आणखी मजबूत होणार आणि हे सरकार पाच वर्षे चालेल” असा विश्वास युवा सेना नेते सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.