तुम्हाला लाज वाटली पाहिजे, ; दिलीप कुमार यांच्या निधनावर भाजप नेत्याच्या विचित्र ट्विट वर भडकली उर्मिला मातोंडकर!

0

बॉलिवूड चे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे सात जुलै रोजी निधन झाले उभा देशभरातून दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पन केल्या. देशभरामध्ये दिलीप कुमार यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात होती अशाच वेळी हरियाणा मधील भाजपचे सोशल मीडिया आणि आयटी विंगचे प्रमुख अरुण यादव यांनी विचित्र ट्विट केले. या ट्विट चा चांगलाच समाचार अभिनेत्री तथा शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी घेतला आहे.

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर हरियणामधील आयटी विंगचे प्रमुख अरुण यादव यांनी ट्विट करत लिहिलं की, ‘फिल्मी जगतात हिंदू नाव ठेवून पैसा कमवणारे मोहम्मद यूसुफ खान (दिलीप कुमार) यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीचं न भरून येणारं नुकसान आहे. शोकग्रस्त कुटुंबासाठी तीव्र संवेदना! देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.भावपूर्ण श्रद्धांजली !’ अशा आशयाचे ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे हे ट्विट आहे.

यावर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी अरूण यादव यांचं विचित्र ट्विट शेअर करत ‘तुम्हाला लाज वाटली पाहीजे. ‘, असे रोखठोकपणे सुनावले आहे. तसेच ट्विटला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर यांनी थम्ब्स डाऊन इमोजीचा देखील वापर पण केलाय.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.