तुम्हाला माहीत आहे का? वेलचीचे हे आरोग्दायी फायदे

0

मसाल्याच्या पदार्थातील सुगंधी वेलची एवढुशी वेलची संपूर्ण पदार्थ सुगंधी तसेच चविष्ट करते.पानाच्या विड्यातही वेलची वापरली जते.याच इलायची किंवा वेलचीचे गुणधर्म बघूया इलायचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. इलायचीमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्सीडेंट घटक असतात. त्याबरोबरच पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे खनिजद्रव्य हि असतात. हिरवी छोटी वेलची व तिचे भरलेले छोटे दाणे उत्तम क्वालिटीची साक्ष देतात. वलचीचे काळे भरीव दाणे चुरडताच उत्तम सुगंध येतो. वेलचीची सालही दाण्यांइतकीच सुगंधी असते.

१) पुरुषांनी रात्री झोपण्याआधी एक इलायची ग्लासभर कोमट दुधासोबत मिसळून नियमितपणे प्यायल्यास शारीरिक कमजोरी निघून जाते.
२) इलायचीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळत सकाळी एक इलायची खाल्याने शरीरातील रक्त परिसंचरण नेहमी सामान्य राहण्यास मदत मिळते तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.
३) जर आपल्या तोंडाला दुर्गंधी येत असेल आणि लोक तुमच्याशी बोलण्यास कचरत असतील तर आपण नियमितपणे एक ते दोन इलायची चघळल्याने आपल्या तोंडाला येणारी दुर्गंधी नाहीशी होते.
४) आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास आपण सकाळी दोन ते तीन इलायची दीड ग्लास पाण्यात उकळून घ्या. नंतर पाणी जरा गार होऊद्या कोमट असतानाच हे पाणी प्या. यामुळे पचन सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.
५)प्रवासात बऱ्याच जणांना मळमळ होण्याची, उलटी होण्याची समस्या असते. त्यांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी एक इलायची तोंडात ठेवा. असे केल्याने आपल्याला प्रवासात मळमळ किंवा उलटी होणार नाही.
६) घसा दुखत असल्यास किंवा खोकला येत असल्यास इलायची युक्त मसाला चहा दिवसातून दोन वेळा घेतल्याने घसादुखी कमी व्हायला मदत होते. सकाळी गरम पाण्यासोबत अर्धा चमचा इलायची पूड मिसळून प्यायल्याने कोलेस्ट्रोल कमी व्हायला मदत मिळते.

वेलचीचा कोणताही अपाय आढळत नाही तसेच वेलची कमी खाल्ली जाते त्यामुळे वरील उपाय आवर्जून करा तसेच स्नेहींना शेअर करा. उपाय आवडल्यास लाईक करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.