‘होय, शिवसेना पक्षप्रमुख गँग प्रमुखच; सुधीरभाऊ, नादाला लागू नका’

0

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन संपन्न झाला. आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, यशाच्या शिखरावर आज शिवसेना महाराष्ट्रात विराजमान आहे. उध्दव ठाकरे यांनी या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसैनिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी बोलत असताना उध्दव ठाकरे यांनी भाजप वरती जबरदस्त टीका केली.

या बद्दल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकारच्या प्रमुखाचं नसून गँगच्या प्रमुखाचं भाषण होतं”. अशी टीका त्यांनी केली होती.

या टीकेला शिवसेना नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की “शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. त्या गँग प्रमुखाच्या बापाने काय केलंय, हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँग प्रमुखाच्या नादाला लागू नका. कारण गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते हे मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिले आहे”, अशा स्पष्ट शब्दांत पाटील यांनी इशारा दिला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.