आज पासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा येल्गार; आंदोलनाचा 173 वा दिवस!

0

शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून आंदोलनाला पुन्हा एकदा सक्रिय होत उद्या पासून शेतकऱ्यांचा येल्गार पेटणार आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातून प्रतिसाद मिळाला. देशभरातून लोक आंदोलनाच्या बाबतीत जबरदस्त सक्रिय सहभाग नोंदवत आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आणि शेतकऱ्यांची गव्हाची कापणी असल्याने आंदोलन काहीसे शांत झाले होते.

मात्र भाजपचा झालेला पश्चिम बंगाल मधील पराजय आणि गव्हाची झालेली कापणी याने नव्या उत्साहात. आता नव्या दमाने शेतकरी आंदोलना साठी दिल्लीच्या सिंधू बॉर्डर वरती जमा होत आहेत. उद्यापासून पुन्हा एकदा एल्गार पेटणार आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे. संपूर्ण देशातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. आजचा आंदोलनाचा 173 वा दिवस होता.आतापर्यंत या आंदोलना मध्ये देशातील 479 शेतकरी वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले. मात्र तरीसुद्धा आंदोलनाची धार काय कमी व्हायला तयार नाही.

10 मे रोजी राष्ट्रिय परिषद होणार आहे. त्या मध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘नो व्होट टू बीजेपी’ ही मोहीम राबवली होती. तशीच मोहीम उत्तर प्रदेश व इतर राज्यांत राबवली जाईल असे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.