
या मराठी अभिनेत्रीचा नवरा दिवाळी फराळ परदेशी विकून झाला करोडपती
सचिन गोडबोले नावाचा एक मराठमोळा व्यापारी दादर मुंबईमध्ये मराठी खाद्यपदार्थाच दुकान चालवतो. आता तुम्ही म्हणाल यात काय वैशिष्ट्य? तर या दुकानातील पदार्थ परदेशात विशेषता अमेरिकेत राहणार्या मराठी माणसाच्या तसेच इतर भारतीयांच्या घरात निर्यात होतात. सचिन गोडबोले एम काॅम असून ते जपानमधील essaye – terookd कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी होते. परंतु वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आईच्या पारंगत पाककृतीला प्रोत्साहन दिले. आई सुमती दिनकर गोडबोले सुगरण होती. सुरुवातीला ५ पदार्थ विकून सुरुवात केलेला हा व्यवसाय सध्या कोट्यवधीची उलाढाल करतो.
सचिन गोडबोले यांच्या दिवाळी पदार्थांना परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हा फराळ परदेशातील भारतीयांना घरचा वाटतो. यातच गोडबोलेंच्या पाककृती व्यवस्थापनेचे वैशिष्ट्य आहे. माधुरी दीक्षित नेने हिच्या अमेरिकेतील घरीही गोडबोलेंचाच फराळ पोहोच होत होता. सचिन गोडबोलेंच्या व्यवसाय करण्याच्या सचोटीवरून कळते की, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते तर ते तुम्ही कशाप्रकारे मांडता तसेच दर्जा कसा ठेवता यावर त्या कामाचे यश अवलंबून असते. अपयशाला न घाबरता काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर सर्वकाही शक्य आहे. दिवाळी फराळासोबतच त्यांनी ड्राय फ्रूट व पॅकेटींग कोरडे पदार्थ विकायलाही सुरुवात केली व समाधानी ग्राहक हेच त्यांच्या यशाचे सूत्र आहे.
सचिन गोडबोलेंची पत्नी किशोरी कुलकर्णी ही मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री असून मराठीतील नामवंत गायक व दादा कोडंकेंचा आवाज असणारे जयवंत कुलकर्णी यांची मुलगी आहे. किशोरी गोडबोले(कुलकर्णी) हिने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडलक्लास, अधुरी एक कहानी, खिडकी अशा हिंदी मालिकांत काम केलेले आहे. तर वन रूम किचन, खबरदार, माझा नवरा तुझी बायको, फूल ३ धमाल असे मराठी चित्रपट केलेले आहेत. या दोघांना सई आणि गौरी अशा दोन मुली आहेत. तर ही आहे ती अभिनेत्री.
मित्रांनो ही माहिती तुम्हाला प्रैत्साहित करत असेल तर आमच्या पेजला लाईक करा आणि लेख स्नेहीजनात शेअर करा.