पोलिसांच्या कामगिरीवर राज्याचे गृहमंत्री बेहद खुश!

0

सोमवारी तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या जबाबदारीने पोलिसांनी चांगले काम केले आहे. या कामाची दखल घेत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केलं आहे. हे वादळ निश्चित महाराष्ट्रासमोर मोठी नैसर्गिक आपत्ती होते. या संकटावर जी मात करू शकलो त्यामध्ये पोलिसांचे योगदान फार मोठे आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की “सोमवारी तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने आपत्ती व्यवस्थापन कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मागील वर्षभरापासून कोविड योद्धे म्हणून आपले कर्तव्य चोख बजावतानाच चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटातही पोलीस दल जनतेच्या मदतीसाठी तत्पर आहे,याचा मला अभिमान वाटतो”. अशा शब्दांत स्तुती करत दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे महाराष्ट्र ज्या ज्या वेळी अडचणीमध्ये सापडला आहे त्या त्या वेळी पोलिसांनी मोठ्या शर्थीने त्या परिस्थितीवर मात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.