गंगेत मृतदेह : मानवाधिकार आयोगाच्या नोटीस नंतर योगींना साक्षात्कार

0

गंगा नदी मधील मृतदेहांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया वरती फार व्हायरल झाले आहेत. बातम्यांच्या मधून हजारो पुरलेल्या मृतदेहांचे आकडे समोर आले आहेत. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने लाजिरवाणी आहे. मात्र यावरती उपाय म्हणून योगी सरकारने ठोस असे पाऊल उचलले नव्हते. योगियांचा कारभार म्हणजे सावळा गोंधळ सुरू आहे. आता मात्र मानवाधिकार आयोगाच्या नोटीस नंतर योगी जिल्हा वेगळा साक्षात्कार झाला आहे.

मृतदेहांचे आकडे लपवले जात आहेत. टेस्ट व्यवस्थित केल्या जात नाहीत. ऑक्सिजन मुळे नागरिक मरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नियमावलीचे कोणतेही पालन न करता नदीच्या कडेला मृतदेह पुरण्यात आले, काही मृतदेह गंगेत सोडून देण्यात आले हे वास्तव जगाच्या समोर आल्यानंतर योगींची चांगलीच धांदल उडाली आहे. सुरुवातीला आमची परंपरा आहे असे सांगण्यात आले. मात्र आता तातडीने निर्णय घेत गंगेचे पावित्र्य धोक्यात आल्याचे योगी सरकारने सांगितले आहे. त्यांनी तातडीने अंत्यसंस्काराचा खर्च न परवडणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येका पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

ते म्हणाले, ‘या मृतदेहांमुळे गंगा नदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून, गंगेचे पावित्र्य धोक्यात येत आहे.’ गंगेत मृतदेह वाहू लागल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने योगी सरकारला नोटीस बजावली होती. त्या नंतर दीड दिवसाच्या चुप्पी नंतर योगी सरकारला गंगेच्या पावित्र्याचा साक्षात्कार झाला आहे. या सगळ्या प्रकरणाला एका वृत्तवाहिनीने वाचा फोडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.