
राजधानीत पोस्टर वॉर, दिल्लीतील वातावरण तापले.
लस परदेशात पाठवली म्हणून दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध पोस्टर वॉर छेडला आहे. नागरिकांनी चांगलेच अॅक्टिव होत लसींच्या बद्दल केंद्र सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून धारेवर धरले आहे. देशात पुरेशा कोरोना प्रतिबंधक लसी नसताना आमच्या लहान मुलांच्या लसी परदेशात का पाठवल्या? असा प्रश्न केला आहे. दिल्ली मध्ये जागोजागी पोस्टर्स लावली आहेत. याच मुद्द्यावरून सरकारने २५ लोकांना अटक केली आहे.
देशातील परिस्थिती गंभीर होत चालली असताना केंद्र सरकारने परदेशामध्ये लहान मुलांच्या लसी पाठवल्या आहेत. कोरोनाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. २५ लोकांनी लसी वरून प्रश्न विचारला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या गोष्टीवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. आम्हालाही अटक करा असे आवाहन सोशल मीडियावर काँग्रेस कडून केलं जातं आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निषेध नोंदवला. राहुल यांनी ‘मोदीजी, हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?’ हाच सवाल करणारे पोस्टर शेअर केले व ‘मलाही अटक करा’ असे खुले आव्हान मोदी सरकारला दिले. आपल्या देशाला प्राथमिकता द्यायची सोडून मोदी सरकार परदेशात लस पाठवत आहे ही देशाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.