
नेता असावा तर असा! मिझोरमच्या कोरोनाग्रस्त मंत्र्यांची अनोखी सेवा; रुग्णालयात पुसली लादी
आपल्या देशातील कोरणा रुग्णांची संख्या रोज तीन लाखापेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येत आहे. देशातील कोरोना ग्रस्तांची संख्या दोन कोटी च्या आसपास पोहचली आहे. लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. राजकारण समाजकारण तसेच नामवंत असणाऱ्या व्यक्तींचा कोरणा मुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये ही कित्येक लोकांनी प्रामाणिक हेतूने सेवा केली आहे.
सध्या सोशल मीडिया वरती मिझोरममधील मंत्र्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांनी रुग्णालयात सेवा केली असून रुग्णालयात फारशी साफ करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. मिझोरमचे ऊर्जामंत्री आर. लालझिरलियाना असे त्यांचे नाव आहे. कोरोना पॉझिटिव्ह असूनही रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये सेवा करत आहेत.
त्यांनी सणागितले की “आम्ही ज्या वॉर्डमध्ये आहोत, तो वॉर्ड खराब होता. मी साफसफाई करण्यासाठी फोन करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याला बोलावलं होतं. मात्र खूप वेळ झाला पण कोणीच आलं नाही. अशातच मी आणखी वाट पाहत बसण्यापेक्षा स्वत: साफसफाई करायला सुरुवात केली. हे स्वच्छतेचं काम करून मला सफाई कर्मचारी अथवा प्रशासनाला खालीपणा दाखवण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याचा उद्देश नाही तर हे एक सामान्य काम आहे. मी माझ्या घरी देखील साफसफाई करतो. अशीच इथेही करतो”
त्यांची असणारी कामाच्या प्रती श्रद्धा, निष्ठा आणि एक राजकारणाच्या पलीकडील व्यक्ती म्हणून असणारी छबी सर्वांच्या मनावर भुरळ घालत आहे. नेता कसा असावा तर असा असावा अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून येत आहेत.