कोरोना झाल्यास अजिबात घाबरू नका या ७ गोष्टींचा आहारात समावेश करून इम्युनिटी वाढवा.

0

कोरोना रिपोर्ट पाॅझीटिव्ह आल्यावर रुग्णाला योग्य ते औषधोपचार सुरू होतात. या उपचारांबरोबरच रुग्णाचा आहारही चतुरस्र असावा लागतो. योग्य आहार, विश्रांती तसेच औषधोपचार याबरोबर सकारात्मक दृष्टिकोन याने तुम्ही निश्चितच कोरोनावर मात करू शकता. कोरोनाच्या दुसर्या लाटेत ज्येष्ठ व्यक्तिंबरोबरच लहान मुलांनाही कोरोना संसर्ग होत आहे. कोरोनाचे नियम तुम्ही सर्वजण काटेकोरपणे पाळत असालच जसे की, सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायजर, मास्क हे नियम पाळूनही काहीवेळा संसर्ग होतोच अशावेळी औषधोपचाराबरोबर आहारात काय घ्यावे याबाबत संभ्रमात असाल तर या ७ गोष्टींचा आहारात समावेश करा व इम्युनिटी वाढवा.

१) अर्धा लिंबू एका नारळाच्या पाण्यात घाला व मिक्स करा हे पाणी दुपारच्या जेवणानंतर दोन तासांनी घ्या. लिंबूमुळे विटामिन सी वाढते.
२) काकडी,गाजर,सिमला मिरची यांचा आहारात समावेश करा. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी स्टार्टर म्हणून हे सॅलेड खाऊ शकता.
३) पपई, भोपळा, सोयाबिन, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा. यात खनिजे, जीवनसत्वे, अँटी आॅक्सीडंट असतात. यांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.संध्याकाळी तुम्ही याच सेवन करू शकता.
४) संत्री, अननस अशी फळे खा. या फळात सी व्हिटॅमिन असून ती संक्रमणास विरोध करतात.
५) पपई, डाळींब जरुर खा. या फळात सी व्हिटॅमिन असून ती संक्रमणास विरोध करतात.तसेच यात लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी बी1 असतात. तसेच यात फायबरही असतात. परिणामी पोट साफ राहते.
६) किवी, कलिंगड या दोन फळात पाण्याचे प्रमाण असते. तसेच विटामीन,अँटी आॅक्सीडंट असतात दुपारच्यावेळी याच सेवन जरुर करा.
७) दररोज सकाळी २ चमचे कांद्याचा रस घ्या, यात फ्लेवोनाॅईडस, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच लोह असते.

मित्रांनो वरील सर्व उपाय शाकाहारी असून सहज उपलब्ध होणारे आहेत. हे घटक आपण दैनंदिन आहारात घेतच असतो, परंतु कोरोना काळात तोंडाची चव जाते तसेच अशक्तपणा येतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहाराचा डाएट चार्ट करा.
मित्रांनो वरील उपाय आवडले असल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. लेख जरुर शेअर करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.