‘वाह रे मोदी तेरा खेल; सोने के दाम में बिकता तेल’।

0

देशात एकीकडे कोरणा च्या परिस्थितीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे दुसऱ्या बाजूला महागाईचा कहर झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, तसेच खाद्य तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या बाबतीत केंद्र सरकारमुद्दामून दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

याच महागाईच्या धर्तीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे यांनी महागाईविरोधात सामाजिक अंतर ठेवून व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंदोलन केले. पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरणानी यांच्या नेतृत्वाखाली कोथरुड येथील करिश्मा चौकातील कासट पेट्रोल पंप येथे हे आंदोलन करण्यात आले.

“बहुत हो गई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार”, ‘वाह रे मोदी तेरा खेल; सोने के दाम में बिकता तेल’। अशा आशयाच्या घोषणा देऊन महागाई विरोधात निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.