‘फिरूनी पुन्हा जन्मेन मी’… कोरोनाशी झुंज आत्ता हरलोय…या अभिनेत्याची भावनिक पोस्ट आणि दुसर्याच दिवशी मृत्यू

0

कोरोनाची दुसरी लाट भारतात वेगाने पसरली असून त्याचा प्रादुर्भाव सगळीकडेच जाणवू लागला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन अनेक उद्योगपती, कलाकार यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यांच्याकडील कोणतीच भौतीक वस्तू त्यांचा जीव वाचवू शकलेली नाही. काही दाक्षिणात्य कलाकार यावर्षी कोरोनान आपल्याला सोडून गेले. श्रीपदा, अभिलाषा, विक्रमजीत आणि पांडू यांसारखे कसलेले अभिनयपटू कोरोनान मृत्युमुखी पडले आहेत. मित्रांनो अशाच एका हरहुन्नरी कलाकाराचे रविवारी कोरोनान निधन झाले. चला त्याला श्रध्दांजली वाहुया.

राहुल वोहरा दिल्लीस्थित असून त्याने अनेक हिंदी, इंग्रजी नाटकात महत्वपूर्ण भूमिका निभावल्या होत्या. यूट्युबर अशीही त्याची ओळख होती. राहुल वोहरा ८ दिवस दिल्लीच्या ताहिरपूर येथील राजीव गांधी हाॅस्पिटलमध्ये कोविड उपचारासाठी दाखल होता. येथील उपचार पध्दतीवर तो नाराज होता. अशातच प्रकृती खालावल्यावर दुसर्या दवाखान्यात भरती करण्याच्या आशयाची पोस्ट त्यानी लिहिली होती. त्यानंतर त्याला द्वारका येथील आयुष्यमान हॉस्पीटलमध्ये भरती केल गेल होत. परंतु प्रकृती बिघडत गेली आणि अखेर राहुल वोहराच कोरोनान रविवारी सकाळी मृत्यू पावला.

राहुल वोहरा मूळचा उत्तराखंडचा होता. सध्या वेबसिरीजमध्ये काम करत होता. ३५ वर्षीय राहुल वोहरा कोरोना संसर्ग झाल्यावर चांगल्या उपचाराची मागणी करत होता. फेसबुकवर मदत मागत होता. त्याने Irahul Vohra या पोस्टमध्ये हाॅस्पिटलसंबंधित डिटेल्स देत पंतप्रधान मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना टॅग केल होत.

शनिवारी राहुलने ‘पुन्हा जन्म घेऊन चांगल काम करेन….आत्ता कोरोनाशी झुंज हरलोय अशा आशयाची वेदनादायी पोस्ट टाकली होती. रविवारी सकाळी तो मृत्युशी झुंज हरला. दिग्दर्शक आणि अस्मिता थियटर ग्रुपचे प्रमुख अरविंद गौर यांनी सोशल मिडीयावरून राहुलच्या मृत्युची दुखद बातमी दिली. रविवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरविंद गौर यांनी सांगितल राहुलच्या तक्रारीनंतर त्याला आयुष्यमान हाॅस्पिटलला भरती केल होत, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही.
मित्रांनो राहुल वोहराला भावपूर्ण श्रध्दांजली.माहिती आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.