महागाई वरून रोहित पवारांचा केंद्र सरकारला सवाल!

0

देशात महागाई ने तोंड फारच वर काढले आहे. मात्र महागाई वरती बोलून सुद्धा काही होत नाही अशी परिस्थिती आहे. निवडणूक काळात पेट्रोल, डिझेल, चे भाव काही पैश्यात कमी होतात. मात्र निवडणूक झाली की रुपयांनी वाढतात. लोकांचे जनजीवन महागाईमुळे विस्कळीत झाले आहे. याच गोष्टीचा निषेध करत पेट्रोल पंपावर जाऊन सत्यजित तांबे यांनी काही वर्षांपूर्वी केलेलं आंदोलन अजून जनमानसांच्या तसेच आठवणीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आ. रोहित पवार यांनी महागाई वरून एक ट्विट करत चांगलेच केंद्र सरकार ला महागाई वरून धारेवर धरलं आहे. “चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय”!

ट्विटर वरती चिमटा काढत त्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. महागाई मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा त्यांच्या या भूमिकेला फेसबुक ट्विटर वरती चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. आपल्या भावना आ.रोहित पवार यांनी मांडल्या यात लोकांना चांगलेच समाधान वाटत आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.