
वेळीच मदत करून त्यांनी देशाची लाज राखली!
भारतातील परिस्थिती फारच बिकट होत चालली आहे. जगभरातून भारताच्या समोर उद्भवलेल्या परिस्थितीवर ताशोरे ओढले जात आहेत. ज्या लोकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटर वरती फॉलो करतात त्या व्यक्तीचा कसलीही मदत न मिळाल्याने मृत्यू होतो यावरूनच आपण परिस्थितीचा परिस्थितीचा अंदाज लावू शकता. अशा मध्येच ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड मिळणे म्हणजे दिव्य आहे.
न्यूजिलँड दूतावासाने युवक काँग्रेसच्या श्रीनिवास आणि त्यांच्या टीमला मोठ्या विश्वासाने ट्विटर वरती ऑक्सिजन सिलेंडरची मदत मगितली. या गोष्टीची तत्काळ दखल घेऊन काँग्रेस ने मदत केली. जगभरात भारताच्या प्रतिष्ठेच्या बाबतीत ही गोष्ट नक्कीच महत्त्वपूर्ण होती. काही क्षणांचा वेळ न लागू देता मदत दिल्या बद्दल नागरिकांनी चांगलेच कौतुक केलं आहे.
त्यांनी केलेल्या ट्विट वरती अक्षरशः नागरिकांची झुंबड उडाली आहे. लोक खूप साऱ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. इतक्या मोठ्या विश्वासाने एखाद्या देशाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून मदत मागितली तितक्याच विश्वासाने मदत पाठवली ही फार देशाच्या दृष्टीने जमेची बाब आहे.