विरोधी पक्षातील आमदार म्हणतात “पक्षातील दादा पेक्षा विरोधक दादा बरा”!

0

काम कोणतेही असो होत असेल तर होय नसेल होत तर नाही. असा अजितदादा पवार यांचा स्वभाव आहे. नियमात, कायद्याच्या चौकटीत जर काम बसणारे असेल तर अजितदादा पवार यांच्या कडे गेलेला माणूस काम न होता पुन्हा आला असे होत नाही. दिल्या शब्दाला जागणारा माणूस म्हणून अजित पवार यांना राजकारणात भल्या पैकी ओळखले जाते.

इतर पक्षांतील आमदार “आपल्या पक्षातील दादा ला सोडून अजितदादा पवार यांच्याकडे मोठ्या विश्वासाने काम घेऊन येतो”. तितक्याच विश्वासाने, जनतेच्या प्रती असलेल्या प्रामाणिक हेतूने अजित पवार काम मार्गी लावतात. महापालिकेच्या दवाखान्यांना आवश्‍यक ते साहित्य खरेदीसाठी शहरातील सर्व आमदारांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु महापालिकेने एका आमदार वगळता अन्य सर्व आमदारांच्या निधीतून खरेदीला मान्यता देखील दिली होती. आमदार निधी देऊनही खर्च टाकत नसल्यामुळे आमदार चांगलेच तापले. त्यांनी सरळ पक्षाच्या ‘दादां’ ऐवजी विरोधी पक्षातील ‘दादां’कडे धाव घेतली. कामाच्या बाबतीत चोख असणाऱ्या अजित पवार यांनी तत्काळ महापालिकेशी संवाद साधून त्या आमदाराला सहकार्य केलं.

अजितदादा पवार यांच्या या कामाच्या बाबतीत चांगलीच चर्चा महापालिकेत सुरू आहे. कामाच्या बाबतीत खरचं दादा माणूस आहे. कोणीही येवो शक्य असेल ते काम होणारच हा विश्वास अजित पवार यांच्या बद्दल जनमानसात उगाच टिकून नाही. तर त्या साठी असणारा मनाचा मोठेपणा हा अजितदादा पवार यांच्याकडे आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.