
सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… डोक्यावर पदर सावरत गाणाऱ्या आजींचा गोड व्हिडीओ पाहिलात?
सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ये दिल बेक़रार करें के नहीं” हे ‘दिवाना’ चित्रपटातील गाणं. १९९२ मध्ये तुफान लोकप्रिय झालं होतं. हे गाणे अनेकांच्या ओठावर होते. कित्येक लोकांनी हे अजरामर गाणे गायले आहे.
एका नऊवारी लुगड्या मधील अज्जीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. डोक्यावर पदर घेऊन “सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ये दिल बेक़रार करें के नहीं, ख़्वाबों में छुपाया तुमको,
यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम, जानम कहीं न कहीं” असं पोटतिडकीने गाणाऱ्या आजीबाई सोशल मीडियावर चांगल्याच आपल्या गोड आवाजाने लोकांच्या काळजाचा ठेका घेताना दिसत आहेत.
सध्या सगळीकडे बंद असल्याने प्रत्येकजण आपला आपला विरंगुळा जोपासताना दिसत आहे. काही चित्र काढत आहेत. काही गाणे गात आहेत तर काही नवनवीन किचन मध्ये पदार्थ बनवत आहेत. अशाच निवांत वेळी अज्जी ने आपल्या मधुर आशा आवाजात गायलेल गाणे खूपच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.