किराणा दुकानात काम करत सोलापूरच्या अश्वीनीने गेट परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला

0

गरिबीवर मात करत एमपीएससी,युपीएसी पास करत शासकीय नोकरी मिळवणार्या अनेक तरूण तरूणींची यशस्वी गाथा आपण वाचली असेल परंतु आज देशातील कठीण समजल्या जाणाऱ्या गेट परीक्षेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार्या आश्विनी कणेकरची जिद्दीची कथा आपण पाहणार आहोत.

गौडगाव येथे जन्मलेल्या अश्विनीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण एस डी गणगे प्रशाला कृष्णानगर पुणे येथे पूर्ण केले.डिकेटीई शिक्षणसंस्था इचलकरंजी येथे गेट परीक्षेची तयारी करून तीने या यशाला गवसणी घातली अश्विनीची घरची परिस्थिती बेताची असून वडिलांनी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला व मुलांचे शिक्षण सुरू ठेवले.पुढे येथेच चरितार्थासाठी छोटे किराणा दुकान सुरू केले.येथे अश्विनी आई वडिलांना मदत करतच अभ्यास करत होती.या सर्व काम2त व घरच्या परिस्थितीमुळे गांगरून न जाता वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत सातत्याने परिश्रम केले.शिक्षणाशिलाय आपण काहीच करू शकत नाही उच्च शिक्षण घेतले तरच उच्च पदावर जाता  येईल व त्यातून देशाची व समाजाची सेवा करता येईल असे तिचे विचार आहेत.यातूनच प्रेरणा घेत तिने घड्याळी चौदा तास अभ्यास करून यश मिळवले.गेल्यावर्षी गेट परीक्षेची तयारी करत असताना कोरोनाचा प्रसार वाढला व त्यातून तिलाही कोरोना झाला परंतु या आजारावर न डगमगता तिने मात करत जिद्दीने अभ्यास करत गेट परीक्षा दिली व 2021 मध्ये यशस्वी झाली. या परीक्षेस 8 लाख 5हजार विद्यार्थी संपूर्ण देशातून प्रविष्ट झाले होते.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेत टेक्स्टाइल विभागात 1000 पैकी 945 गुण मिळवत टेक्स्टाइल विभागात देशात प्रथम क्रमांक पटकावला.या विभागाचा निकाल 17टक्के लागला असून अश्वीनीने 79.67टक्के गुण मिळवले आहेत.

दरम्यान अश्विनीच्या या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांनी तिचे अभिनंदन केले.अश्विनीने टेक्स्टाइल विभागात मिळवलेल्या यशाबद्दल अभिमान असल्याचे नामदार प्रकाश आवाडे म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.