भाजप नेते राम शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात आ.रोहित पवारांच्या एन्ट्रीने, सगळेच आश्चर्यचकित!

0

माजी मंत्री राम शिंदे यांच्या कन्येचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला आहे. राज्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. या सगळ्या गर्दी मध्ये आ. रोहित पवारांची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. राजकारणाच्या जागेवर राजकारण, इतर वेळी नाते जपणे ही पवारांची खासियत आहे हे सर्वांनाच दिसून आले.

रोहित पवारांनी सुद्धा ट्विट करत या बद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की “भाजपचे नेते राम शिंदे साहेब यांच्या कन्येच्या लग्न समारंभास उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या आणि शिंदे साहेब यांच्या मातोश्रींचेही आशीर्वाद घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब, प्रविण दरेकर साहेब, महादेव जानकर साहेब यांच्यासह इतर आमदार व नेतेमंडळींची भेट झाली”.

आ.रोहित पवार यांनी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सुध्दा आपले विरोधक राम शिंदे यांची भेट घेतली होती. उभ्या महाराष्ट्रात या दोघांच्या दिलदार मनाचे दर्शन झाले होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.