
उजळ, नितळ त्वचेमुळे चेहरा सुंदर दिसतो. बरेचदा उन्हामुळे त्वचा काळवंडते तसेच चेहर्याचे तेज नाहिसे होते, अशावेळी आपण बाजारात उपलब्ध असणार्या अनेक क्रिम लावतो. त्याने बरेचदा चेहरा उजळतो परंतु त्यामुळे साईड इफेक्ट जाणवतात. अशावेळी आपले परंपरागत उपाय वापरल्याने त्वचेचा रंग उजळतो तसेच चेहर्यावर तेज येते.
साहित्य :
१) बेसन पीठ – २चमचे
२) संत्रा साल – १ चमचा
३) दही – १चमचा
बेसन पीठ २ चमचे, संत्रा साल १ चमचा, दही १ चमचा हे सर्व मिश्रण एकत्र फेटून घ्या. नीट मिक्स झालेल हे मिश्रण चेहर्यावर लावा व पंधरा मिनिटांनी धुवून टाका. हा पॅक आठवड्यातून किमान चारवेळा लावा. या पॅकमुळे चेसर्यावरील काळे डाग, पुरळ, मुरुम, डोळ्याखालची काळी वर्तुळ नाहिशी होतात. बेसन पीठ उत्कृष्ट स्क्रबर असून या सक्रबमुळे चेहरा चांगला घासला जातो. परिणामी चेहर्यावरील धूळ नाहिशी होते.
वरील उपाय पूर्णपणे निर्विष असून याचा कोणताही अपाय होत नाही.