
त्यांच्या जीवाच काही बर वाईट झाल तर उदयनराजे जबाबदार राहतील का?शशिकांत शिंदेंचा घणाघात
काल मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक घेत राज्यात किमान आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार मांडला,बैठकीला सर्व पक्षांचे नेते,प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर सर्वानुमते आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा व लोकांच्या जीवाची जपणूक व्हावी या हेतूने टास्क फोर्सशी बैठक करून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच राज्यात आधीच दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन सुरू असून शनिवार,रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे.
काल या विकेंड लाॅकडाऊनचा विरोध करत उदयनराजे भोसले यांनी हातात कटोरा घेऊन फिरून तसेच फूटपाथवर बसून भीक मांगो आंदोलन केल,आणि सरकारचा निषेध केला.
उदयनराजेंच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल आहे.शशिकांत शिंदे म्हणाले,उदयनराजे भोसले विकेंड लॉकडाऊन नको म्हणत आहेत,परंतु भविष्यात कोरोना चेन ब्रेक न झाल्यान जर कोविड रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले व त्यांच्या जीवाच काही बरवाईट झाल तर उदयनराजे भोसले जबाबदार राहणार आहेत का?असा सवाल शशीकांत शिंदेंनी विचारला आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले,लोकप्रतिनीधी म्हणून काम करताना परिस्थितीच गांभिर्य समजून घेत भविष्याशी निगडित निर्णय घ्यावे लागतात.अशा जागी राजकारण करण चुकीच असून सगळ्यांचाच जीव महत्वाचा असा विचार करून वागल पाहिजे.