राज्यात लागणार का लॉकडाऊन? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद

0

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून काल दिवसभरात 40000 च्या वर रुग्णसंख्या राज्यात कोरोना बाधित ठरली होती.राजकयात पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यात आली असून लसीकरणही वेगाने सुरू आहे.विदर्भ,मराठवाड्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागला असून पुणे व मुंबई या प्रमुख शहरात कोरोना साथ वेगाने पसरत आहे.लहान मुलातही कोरोना साथ पसरत असल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईत कडक निर्बंध लावले होते.सोशल डिस्टन्सींग, मास्क,सॅनिटायजर वापरा याच आवाहनही करत होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुणे शहराला 1 तारखेचा अल्टीमेटम दिला होता व नियम पाळल्यास प्रवृत्त केले होते.परंतु सण वार, यात्रा, जत्रा यामुळे वाढती गर्दी आणि त्यान सगळे नियम धाब्यावर बसवले जात असून कोरोनाचा विस्फोट सुरू आहे.परिणामी भविष्यात पुरेशा आरोग्य सेवा पुरवता याव्यात व जनतेचे प्राण मूल्यवान हे धोरण ठेवत मुख्यमंत्री आज शुक्रवारी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज संध्याकाळी 8.30वाजता लाईव संवाद साधणार असून स्वताच मनोगत व्यक्त करण्याबरोबरच राज्यात लॉकडाऊन लावणार की निर्बंध वाढवणार यावर भाष्य करणार आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.