सोनू सूदची राजकारणात एन्ट्री होणार?

0

सध्याच्या काळात सोनू सूद हा मोठा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच्या अभिनयाच्या पेक्षा जास्त चर्चा सगळीकडे त्याच्या सामाजिक कामाची होताना दिसते. त्याने कोरोनाच्या काळात अनेक लोकांना मदतीचा हात दिला आहे. बॉलीवूड सेलिब्रेटींना राजकारणाचे काही वावड़े नाही. यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी आपले फिल्म करिअर सोडून राजकारणाची वाट धरलेली दिसते.

सध्या अभिनेता सोनू सूदच्या राजकीय प्रवेशाची रंगली आहे.मात्र याला अर्थ नसल्याचे त्याने सांगितले आहे. पण जेव्हा केव्हा राजकारणात येईल त्यावेळी मी सर्वांना ओरडून सांगितल्याशिवाय राहणार नाही. असंही त्यानं सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्याने हे सांगितले. त्याने कोरोणा मध्ये कित्येकांना मदत केली आहे. त्याला मानणारा एक मोठा वर्ग सध्या निर्माण झाला आहे, की जो राजकारणाच्या विरहित सामाजिक कार्यात सहभागी असणारा आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.