मुख्यमंत्री येत्या २ दिवसांत घेणार निर्णय, राज्यात लॉकडाऊन वाढणार?

0

मुंबई : देशात करोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत असून, बाधित रुग्णांच्या संख्येत अतिशय वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशात, करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले असून, राज्यात देखील १ मे पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

मात्र तरीही राज्या करोना परिस्थितीमध्ये सुधारणा दिसत येत नाहीये. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या अधिकच वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत असून, नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नसल्यामुळे, राज्यातला लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट इशारा, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतचे संकेत दिले. तसेच, १ मे नंतर संचारबंदी आणि निर्बंध वाढवण्याच्या विचारावर मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

यावेळी त्यांनी, अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध होता. पण आता तेच व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची, इतर लहान दुकाने असणारेही १००% लॉकडाऊन करा, अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमधून देखील हीच मागणी नागरिक करत असून, आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काल राज्यात तब्ब्ल करोना बाधित रुग्णांच्या आकड्यामध्ये ६७ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे आणि एकाच दिवसात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.