वाढदिवसाच्या निमित्त कापलेला तो केक सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी का स्पेशल गिफ्ट आहे?

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खा.सौ.सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा झाला. राज्यभरातील नव्हे तर देशभरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा सोशल मीडिया वरती पाऊस पडला. मात्र वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी स्वतःहून पोस्ट करत सुप्रियाताई सुळे यांनी वाढदिवसानिमित्त आणलेल्या केक ची ट्विटर वरती ट्विट करत माहिती दिली.

सुप्रिया ताई म्हणतात की “हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं”. अशा आशयाचे त्यांनी ट्विट केलं आहे.

सुप्रिया ताई यांची लेक रेवती सुळे यांचे नोकरी करत असल्यामुळे सुप्रिया ताई यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे. मुलीच्या पगारातून आणलेला केक फार मोठी गोष्ट आहे; अशा आशयाचे ट्विट करत कौतुक केले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.