मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय – रुपाली चाकणकर

0

सध्या सगळीकडे कोरोनामुळे बंद आहे. अशा अडचणीच्या काळात देशातील महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने चांगलेच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच गोष्टीला लक्षात घेत महागाई वरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

रूपालीताई ट्विट करत म्हणाल्या की “दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं…. काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ!!
” सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय??

असे म्हणत त्यांनी चांगलाच केंद्र सरकारला महागाई वरून चिमटा काढला आहे. मुख्यतः महागाई वरून लोकांत मोठा रोष निर्माण झाला आहे. वारंवार महागाई वाढत चालली आहे. केंद्र सरकार काहीही करायला तयार नाही. सर्वसामान्य माणसाचे आज कौटुंबिक बजेट कोसळले आहे. यावर त्यांनी लक्ष वेधले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.