“हिंदू धर्माच्या सणावेळीच का ज्ञान देता”त्या पोस्ट ने रितेश देशमुख झाला ट्रोल..!

0

एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो रितेश देशमुख. राजकीय वारसा असूनही स्वतःच्या अभिनयाने ज्याने चित्रपट सृष्टी मध्ये स्वतःची जागा मिळवली तो मराठमोळा रितेश देशमुख हा खूप लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

खरंतर रितेश सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सणं सुरु होतात आणि या काळात लोकांना मिठाई खाण्यास आवडते. अशातच या वेळी रितेशने मिठाई खाल्यामुळे नुकसान होते आणि मिठाईची वाढलेली किंमत पाहता एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.

मात्र, ही पोस्ट पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल केले आहे. त्यानंतर रितेशने त्या नेटकऱ्याला सुद्धा ताबडतोब उत्तर दिलं आहे.खरंतर रितेशने ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रितेशने मिठाईच्या किंमती टाकल्या आहेत.

मजेशीर म्हणजे सणांमध्ये मिठाईचे वाढते दर आणि दुसरीकडे त्यानंतर वजन कमी करण्यासाठी लागणारा खर्च लिहिला आहे. यात लाडू, जलेबी, काजू बर्फी आणि चॉकलेटचे भाव सांगितले आहेत. या लिस्टच्या शेवटी वजन कमी करण्यासाठी लागणारे पैसे.

हे शेअर करत “डोक लावून निवडा, मला वाटलं तुम्हाला चेतावनी देऊ”, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.रितेशचे हे ट्वीट पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल केले आहे. “तुम्ही फक्त सनातनी सण असतात तेव्हा ज्ञान देता का? ईद किंवा ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही तोंडात दही गोळा करतात”,

अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर रितेशने एक मजेशीर उत्तर दिले आहे. रितेशने लिहिले “सॉरी सर, मी विगन आहे, मी दही खात नाही.” रितेशने दिलेले हे उत्तर काही नेटकऱ्यांना आवडले आहे.

खरंतर नेहमीच आपल्या अभिनयाने हसवणारा अभिनेता यावेळी ट्विटर वर मिठाई च्या वाढलेल्या महागाई ला लिहून लोकांना हसवू पाहत होता;काही दिवसांपूर्वी सुद्धा रितेश ची पत्नी जेनेलिया ला सुद्धा ट्रोल केलं होतं तेंव्हा सुद्धा या दोघांनी ट्रोलर्स ला सडेतोड उत्तर दिलं होतं.खरंतर ट्रोलर्स आणि सेलिब्रिटी यांचं नातं जरा वेगळंच असतं, ही आजच्या डिजिटल युगातील वास्तविकता आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.