“तुम्हाला एकच मुलगी का?”, शरद पवारांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

0

देशाचं राजकारण करत असताना शरद पवारांनी अतिशय धूर्तपणाने राजकारण केलं आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांना याच राजकीय खेळामुळे ओळखले जाते. मात्र आपल्या खाजगी आयुष्यामध्ये शरद पवारांनी जे काही निर्णय घेतले ते महाराष्ट्रातील जनतेला अभिमानाचा विषय वाटावा अशी आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एकच मुलगी आहे त्यांचे नाव खा. सुप्रिया सुळे शरद पवार यांनी दुरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत या बद्दल माहिती दिली आहे. दूरदर्शनच्या एका जुन्या मुलाखतीत ‘मुलगा हवाच याचा हट्ट असताना तुम्हाला एकच मुलगी कशी काय? असा प्रश्न तुम्हाला लोक विचारत असतील. त्याचं समाधान तुम्ही कसं करता असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता.

यावर शरद पवारांनी उत्तर देताना सांगितलं होतं की, “या प्रश्नाला मला अनेकदा उत्तर द्यावं लागतं. खेड्यापाड्यात गेल्यानंतर लोक मुलगा असता तर बरं झालं असं म्हणतात. शेवटी नाव चालवायला घरात कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी देण्यासाठी पाहिजे”. मुलानेच अग्नी दिला तर स्वर्गाचा रस्ता खुला होतो असंही अनेकजण शरद पवारांना सांगायचे.

शरद पवारांचा मुलीच्या बाबतीत असणारा निर्णय हा त्यांच्या राजकीय आयुष्य बरोबरच सामाजिक भान असणारा नेता याची पुष्टी देणारा हा निर्णय आहे. आपल्या आपल्या जगण्यातून, आपल्या वागण्या मधून त्यांनी हा महत्त्वपूर्ण असा संदेश दिला आहे. आज सुप्रिया सुळे या देशाच्या राजकारणात कर्तृत्वाने काम करताना दिसतात!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.