का साजरी करतात आषाढी एकादशी, वारकरी का धावतात सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला

0

विठू माझा लेकूरवाळा
संगे गोपाळांचा मेळा
असा समज आहे की, या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले, त्यामुळे पुरातन तीर्थ क्षेत्राचे उल्लेख करताना आवर्जून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्त्व आहे. दर आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात आणि ही पंरपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे बघायला मिळते. कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी या साधनेचा एकमेकांकडे अनुभव देण्यासाठी आणि पुढीला पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आषाढी एकादशी या दिवसाला महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.

एका वर्षामध्ये साधारणतः १४ एकादशी येतात. यामध्ये पुराणापासून आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच स्थान आणि महत्त्व आहे. आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीचे व्रत खूप प्रभावी मानले जाते. भगवान विष्णूचा निद्रा कालावधी देवशायनी एकादशीच्या दिवसापासून सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असेही म्हणतात.

देवशयनी एकादशी २०२१ शुभ मुहूर्त
यंदा २० जुलै, २०२१ रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. १९ जुलै रोजी रात्री ९ वाजून ५९ मिनिटांनी एकादशी सुरू होत असून २० जुलै, २०२१ रोजी संध्याकाळी ७.१७ वाजता एकादशी संपणार आहे. देवशयनी एकादशी मंगळवार २० जुलै २०२१ रोजी आहे.
एकादशी आरंभ तिथी – १९ जुलै २०२१ रोजी रात्री ९.५९ वाजता
एकादशी समाप्ती तिथी – २० जुलै २०२१ रोजी सायंकाळी ७.१७ वाजता

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.