
पार्थ पवार का भेटले हर्षवर्धन पाटीलांना ?
हर्षवर्धन पाटील यांनी खासदारकीसाठी सुप्रिया ताई सुळेंना पाठिंबा देत इंदापूरमध्ये मताधिक्य मिळवून दिले होते, परंतु हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले व त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.दरम्यान हर्षवर्धन पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू समजले जातात.परंतु सामाजिक जीवनात भावनांना अधिक महत्त्व दिलं जात.याच परंपरेचा पाईक होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून संपूर्ण कुटुंब शोधात आहे.याच पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जात सांत्वनपर भेट घेतली आहे.मयूरसिंह पाटील हे हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू असून त्यांच्या आई अनुराधा अरुणराव पाटील यांच काही दिवसांपूर्वी निधन झाल, पार्थ पवारांनी मयूरसिंह पाटील आणि संपूर्ण कुटुंबाची भेट घेत सांत्वन व्यक्त केल.
हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिताही यावेळी उपस्थित होती.पार्थ पवार व अंकिता पाटील यांनी एकत्रच राजकारणात प्रवेश केला होता.अंकिता पाटील लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणुक लढवत विजयी झाल्या होत्या तर पार्थ पवार मावळमधून हरले होते.पार्थ पवार यांनी दिलखुलासपणे ही हार स्वीकारत पुन्हा नव्या जोमाने राजकारणात सक्रिय झाले आहेत.