इंडियन आयडॉल मधून अंजली का पडली बाहेर ? तिनेच केले रोचक खुलासे

0

इंडियन आयडॉल हा रियालिटी शो प्रेक्षकांचा फेवरेट असून नवोदित गायकांच व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. या शोमधून आपली कला सादर करणारे अनेक गायक उत्तम करियर घडवू शकले आहेत. संगीताच्या या मैफलीत सहभागी होणारे गायक संपूर्ण भारतातून आलेले असतात. या गायकांना मोठ्याप्रमाणावरील प्रेक्षकवर्ग ऐकत असून प्रेक्षकांचे स्वताचे फेवरेट पार्टीसिपंट होतात. या शो तील नवोदित गायकांचीही फॅन फॉलोइंग असून ते त्यांना सपोर्ट करत असतात. या शोवर सध्या बरीच टिका होत असून शो मधून लोकप्रिय गायिका अंजली हिची अंतिम फेरीच्या काही दिवस आधीच बाहेर पडली आहे. अंजलीच्या फॅनना हे आवडल नसून शो वर टिकेची झोड उठली आहे.

इंडियन आयडॉल आता शेवटच्या टप्प्यात येत असून शो मध्ये अंतिम फेरीला काहीच दिवस उरलेले आहेत, अशावेळी अंजली हिला परिक्षकांनी बाहेर केल्याने प्रेक्षक नाराज झाले असून अंजलीऐवजी षणमुख प्रिया हिला बाहेर करण गरजेच आहे अस प्रेक्षकांनी मत नोंदवल आहे.सोशल मिडीयावर यावय चर्चा असून अनेक कमेंट येत आहेत. अंजली अंतिम फेरीत असायला हवी अशी अनेक प्रेक्षकांनी कमेंट केली आहे. अंजली बाहेर पडली कशी असा प्रश्न बरेचजण विचारत असून या शोबद्दल अंजलीनेच काही खुलासे केले आहेत.

अंजली म्हणाली की, या शोत पहिल्या दोन ते तीन महिन्यात बरच कौतुक झाल परंतु नंतर मात्र शो वर टिका सुरू झाली. शोचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर टिका करण्यात आली की, शो मध्ये एकाच गायीकेला उजाळा दिला जातो. इतर गायकांना दुय्यम वागणूक मिळते. परिक्षकांवरही टिका होत होती तसेच ट्रोलरही बरेच ट्रोल करत होते. या सर्वातून आम्ही फक्त परफॉरमन्सकडे फोकस करून बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होतो. शो मधून कुणालातरी एलीमेट केलेच जाते तो शोचा फॉरमॅट आहे त्यामुळे मी बाहेर पडले. वाईट निश्चितच वाटल परंतु वडीलांनी धीर दिला. मला शास्त्रीय संगीत पुढे आणायच असून देश, विदेशात प्रोग्रॅम करायचे आहेत. आयुष्यात बरच काही करण्यासारख असून मला गायनात करियर करायच आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.