अनिल अंबानीचा धंदा का बुडाला ? का झाले ते रोडपती

0

अंबानी परिवार भारतातील श्रीमंत परिवारापैकी एक आहे. धीरूभाई अंबानी यांनी या परिवाराच्या उद्योगाचा पाया घातला. धीरूभाईंचे दोन मुलगे मुकेश आणि अनिल त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. पैकी मुकेश अंबानीनी गरूड झेप घेत फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवले. परंतु अनिल अंबानी मात्र बँक्रप्ट झाले. कर्जबाजारी होऊन त्यांचा बिझनेस लॉसमध्ये आला. असे का घडले चला जाणून घेऊया.

धीरूभाईंनी एडनमध्ये पेट्रोल कर्मचारी म्हणून काम केल. ५०० रुपये घेऊन परतलेल्या धीरूभाईंची कंपनी १९७७ ला लिस्टेड झाली. धीरूभाईंनी मृत्यूपत्र तयार केले नव्हते. मुकेश यांनी पेट्रोलियम आणि दूरसंचार कंपनी उत्तम प्रकारे सांभाळली होती. २००४ साली विभक्तीकरण झाले. मुकेशना जुने व्यवस्थापन असलेल्या कंपन्या मिळाल्या. रिलायंस इंडस्ट्री, रिलायंस पेट्रोलियम इत्यादी. अनिल अंबानी यांना नवीन अर्थव्यवस्था असलेल्या कंपन्या मिळाल्या. रिलायंस कम्युनिकेशन, रिलायंस कॅपीटल इत्यादी. अनिल अंबानी यांच नामकरण ADAG केल. अनिल अंबानी यांच्या वाट्याला ४२ बिलीयन इतकी संपत्ती वाट्याला आली. अनिल अंबानी जगातले सहावे श्रीमंत व्यक्ती ठरले. २००५ साली अनिल अंबानीनी Adlabs कंपनी विकत घेतली.स्टीवन स्पीलबर्गबरोबर ७५०० करोडचा व्यवहार केला. अनिल अंबानी राज्यसभेचे सदस्य झाले.

आता अनिल अंबानीची उतरती कळा सुरू झाली. गोदावरी गॅस प्लांटमधील गॅस पुरवठ्याचे दर वाढले. अनिलनी मुकेशना न्यायालयात खेचले मात्र निकाल मुकेश यांच्या बाजूने लागला. रिलायंस मोबाईल CDMA तंत्रज्ञान वापरत होते जे फक्त 2 जी, 3 जी ला उपयुक्त होते. परंतु एअरटेल, हच यांनी GSM तंत्रज्ञान वापरून 4 जी, 5 जी तंत्रज्ञान विकसित केले. परिणामी मोबाईलचा धंदा बुडाला. त्यातच मुकेश यांनी रिलायंस जीओ स्थापून नवीन क्रांती घडवली. अनिलना कर्ज डोईजड झाले. ते फेडण्यासाठी त्यांनी बिग सिनेमा कार्निवल सिनेमाला ७१० करोडमध्ये विकला. अनिल यांनी कोणताही अनुभव नसताना रक्षा क्षेत्रात गुंतवणूक केली आणि त्यात त्यांना लॉस आला. रिलायंस एनर्जी अदानी ग्रुपला १८००० करोडला विकली. अनिल यांनी १२५०० करोडचे कर्ज Yes Bank मधून घेतल. हे कर्ज फेडता येत नसल्याने दिवाळखोरी जाहीर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.