
लस घेतल्यानंतरही का होऊ शकतो कोरोना? आदर पूनावाला यांच स्पष्टीकरण
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोना लागण झाल्याच समोर आल आहे.त्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचाही समावेश आहे.परिणामी अनेकजण या लसींबाबत शंका व्यक्त करत आहेत व लस घेऊन उपयोग काय?असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
यावर उत्तर दिल आहे सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी. अदर म्हणाले, कोव्हिशिल्ड ही लस बुलेट प्रुफ जॅकेटसारखी असून ज्याप्रमाणे जॅकेटवर गोळी लागल्यास तुमचा मृत्यू टळतो पण थोड डॅमेज सहन कराव लागत त्याच प्रकारच काम लस करते.
या लसीमुळे तुम्ही आजाराची गंभीरता टाळू शकता तसेच 95 टक्के केसेसमध्ये तुम्हाला रुग्णालयात जाव लागत नाही.परंतु या लसीमुळे तुम्हाला कोरोनाची लागण होणारच नाही असा गैरसमज तुम्ही दूर केला पाहिजे.लस घेतल्यानंतरही कोरोनाचे नियम जसे मास्क, सॅनिटायजर,सोशल डिस्टन्सींग पाळावेच लागतील.
या लसीमुळे तुमच्यात कोरोना संसर्ग रोखण्याची प्रतिजैविक वाढून तुमची प्रतिकार शक्ती वाढते.जागतिक आरोग्य संघटनेनेही या लसचे कौतुक केले असून त्याला युरोपात मागणी आहे.भारतातही सर्वांनी लसीकरण करून घेण गरजेच आहे.
व्हॅक्सीनचे काही साईड इफेक्ट्सही दिसून आलेत परंतु ते नगण्य असून ज्या वयाच्या व्यक्तीत दिसून आले त्याची मेडिकल हिस्ट्री किंवा ब्लड क्लॉटींग तपासावे लागते.अन्यथा सर्व प्रौढ व्यक्तींना ही लस उपयुक्त आहे.सध्या सिरम 18 वर्षाखालील 12 वर्षापर्यंतच्या मुलांना लस देण्याची ट्रायल सुरू करण्याच्या विचारात आहे, अमेरिकेत ही ट्रायल सुरू झालेली आहे.
सिरमनेही त्यासाठी अर्ज केलेला आहे.परंतु यासाठी सहा महिन्याचा काळ जाऊ शकतो.लसीची ट्रायल घेतल्यानंतरच ती 12 वर्ष व त्यापेक्षा कमी वयोगटातील मुलांना दिली जाईल.