भूतानची चिमुरडी खेनब येदजिन सेल्डन का होतीये व्हायरल…

0

नवी दिल्ली : भारतात सध्या करोनाची दुसरी लाट सुरु आहे. करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये. दरम्यान, लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे सुरू असून, निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. करोनाच्या या संपूर्ण काळात, आपल्या देशातील नागरिकांना लस देतानाच भारताने, आपल्या शेजारी राष्ट्रांनाही मदतीचा हात दिला आहे.

अशाच मदत मोहिमेच्या अंतर्गत भारताने शेजारील राष्ट्र भूतानलाही करोनाची लस पुरवली आहे आणि या पार्श्वभूमीवर भूतानमधील एका गोड मुलीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या गोड मुलीची निरागस शैली लोकांना खूप भावते आहे.

भूतानमधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप पाठवली आहे. या व्हिडिओत खेनब येदजिन सेल्डन नावाची एक बालकलाकार आहे. तिच्या मनातील भारताबद्दलच्या भावना बोलत आहे. करोना लसींच्या पुरवठ्यासाठी खेनबनं भारताला, अतिशय गोड आणि मोहक शैलीत धन्यवाद दिले आहेत.

या इंग्रजीतील क्लिपच्या सुरवातीला तिनं स्वतःची ओळख सांगितली आहे. त्यानंतर ती कोरोनावरची लस पाठवल्याबद्दल भारत सरकारचं आभार मानते.

या व्हिडिओचा शेवट तिनं शुक्रिया भारत या शब्दानं केला आहे. रुचिरा कंबोज यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला, जवळपास बारा हजार लोकांनी पाहिलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.