रियल लाईफमध्ये ‘ PSI ‘ असणारी हि अभिनेत्री आहे तरी कोण?

0

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातून अनेक युवक प्रशासकीय सेवेत यश आजमावताना दिसून येत आहेत. अत्यंत खडतर आर्थिक परिस्थितीतून ते अहोरात्र कष्ट करून हे यश मिळवत आहेत.घरच्या गरिबीवर ही तरुणाई मात करत आहे. पोटाला चिमटा देऊन, पार्ट टाईम नोकरी करून, रात्री अभ्यास करून ही मुल यश मिळवतात. शेतकरी, कष्टकर्यांची मुल प्रशासकीय सेवेत अधिकारी होत आहेत.यात पीएस आय होणारेही बहुसंख्य आहेत. या पोलीस अधिकार्यांकडे इतरही कलागुण असून मध्यंतरी एका इन्स्पेक्टरचा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्याला लोकांनी मोठ्या प्रमाणावर लाईक केल होत. खात्यानही त्यांना प्रोत्साहन दिल होत. अशाच एका सौंदर्यवती लेडी पोलिसाची सत्य कथा पाहणार आहोत.

ही तरुणी आहे, पल्लवी जाधव सध्या महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय आहे.पल्लवी जाधव ही मुळची औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पल्लवी जाधव हिचा जन्म एका गरीब कुटुंबांमध्ये झाला. तिचे वडील शेती काम करतात. घरची हलाखीची परिस्थिती होती. त्यामुळे तिच्या दोन्ही बहिणीचे लग्न लवकर करावे लागले. मात्र, पल्लवी ही शिक्षणात हुशार असल्याने तिच्या वडिलांनी तिला शिकून मोठे करायचे ठरवले. इतरांच्या टोमण्यामुळे मात्र ती चांगलीच त्रासुन गेली होती.अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी पाच हजार रुपयांचे कर्ज काढून तिला एमपीएससीच्या परीक्षेला बसवले आणि तिने देखील आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत एमपीएससी परीक्षा पास केली. तिचे शिक्षण औरंगाबादच्या बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये झालेले आहे.पल्लवी जाधव सध्या जालना येथे गेल्या पाच वर्षांपासून पीएसआय या पदावर कार्यरत आहे.
दिसायला सुंदर असणारी पल्लवी २०२० मध्ये मिस इंडिया रनर अप होती.पल्लवी जाधव सोशल मीडियावरदेखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे फॉलॉअर हे लाखांमध्ये आहेत. पल्लवी जाधव हिला अनेक वर्षापासून अभिनयाची आवड आहे. यामुळेच ती आपले फोटो मीडियावर अनेकदा अपलोड करत असते आणि त्याला चाहतेदेखील खूप लाईक करत असतात.आता लवकरच ती एका चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येते. लवकरच हैदराबाद कस्टडी नावाच्या चित्रपटात ती दिसणार आहे. याबरोबरच ती एमपीएससी होऊ इच्छीणार्या तरुणाइलाही मार्गदर्शन करत असते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.