कोण आहेत जयश्री पाटील? ज्यांनी दाखल केली गृहमंत्री अनिल देशमुखांविरुध्द याचिका

0

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर लेटर बॉम्ब टाकत गंभीर आरोप कलेले आहेत.या आरोपांमुळे गृहमंत्री अडचणीत आले होते, परंतु त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.या सर्व घडामोडीत राज्य सरकारनही एक सदस्यीय निवृत्त न्यायाधिशांची चौकशी समिती नेमली होती,परंतु अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयान अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करावी व पंधरा दिवसात कोर्टाला अहवाल द्यावा असे आदेश दिले आहेत.परिणामी गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिलेला आहे.

अॅड. जयश्री पाटील या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत.कायद्याची पदवी घेत त्यात त्यांनी पीएचडी केली आहे.मानवाधिकार या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केल आहे.जयश्री पाटील यांच्या माध्यमातून गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती.या याचिकेद्वारे जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता.त्या स्वता मराठा आहेत.या याचिकेद्वारे जयश्री पाटील यांनी सर्वप्रथम हायकोर्टात व नंतर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडली होती.

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सुनावणी करताना कोर्टाने सांगितले की, अनिल देशमुख स्वता गृहमंत्री आहेत परिणामी पोलिसांकडून त्यांच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही,परिणामी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करावे व चौकशी करून अहवाल कोर्टाला द्यावा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.