विराट कोहलीच दक्षिण अफ्रिकेत राष्ट्रगीत सुरू असताना लाजीरवाण कृत्य नेटकरी म्हणाले, ” तु पाकीस्तानात जा. “

0

केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात तिसरी वनडे सामना रंगत आहे. पहिले दोन सामने जिंकल्यामुळे आफ्रिकेने मालिका खिशात टाकली आहे. त्यामुळे शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला.

परंतु सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने केलेल्या एका कृतीमुळे तो जबरदस्त ट्रोल होऊ लागला. विराट सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो राष्ट्रगीतादरम्यान च्युइंगम चघळताना दिसत आहे. या व्हिडिओवरून विराटला ट्रोल केले जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, भारतीय संघाचे बाकीचे खेळाडू राष्ट्रगीत म्हणत आहेत, तर विराट च्युइंगम खाण्यात व्यस्त आहे. त्याच्या या कृतीला सोशल मीडियावर लाजिरवाणे म्हटले जात असून चाहते प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

केपटाऊनच्या मैदानावर आज भारताचा कप्तान केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकचे शतक आणि रूसी व्हॅन डर डुसेनच्या अर्धशतकाच्या जोरावर आफ्रिकेने भारताला २८८ धावांचे आव्हान दिले आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली होती, पण या सामन्यातील शेवटच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आफ्रिकेला तीनशेपार जाता आले नाही. प्रत्युत्तरात भारताकडून विराटने अर्धशतक ठोकले. संघाला आधाराची गरज असताना विराट केशव महाराजचा बळी ठरला. विराटने ५ चौकारांसह ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.