
आ.धीरज देशमुख यांनी बोलत असताना आज विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला!
स्व.विलासराव देशमुख यांनी राजकीय क्षेत्रात काम करत असताना मोठी उंची प्राप्त केली होती. मात्र त्यांचे पाय जमिनीवर होते. कार्यकर्त्यांचा एका रिंग वरती फोन घेऊन काम मार्गी लावणे हा त्यांचा स्वभाव. दांडगा असणारा लोकसंपर्क, त्यांची असणारी अमोघ वकृत्व शैली. मोठा असणारा व्यासंग आणि विचारांची स्पष्टता हे महत्वपूर्ण असे गुण त्यांच्या मध्ये होते.
विलासराव देशमुख यांच्या बद्दल ट्विटर स्पेस वरती विविध मान्यवर बोलत होते. धीरज देशमुख यांनी बोलताना आठवणींना उजाळा दिला.
“मी शाळेत असताना वडील काय करतात असे विचारायचे तेव्हा ते शेती करतात, असे सांगायचो. फॉर्मवर लिहायचो. तेव्हा ते कोणत्या ना कोणत्या खात्याचे मंत्री होते. माझ्या वडिलांनी मला सांगितले की राजकारण ही तुमची ओळख नाही. गावाकडची शेती, जमीन हीच आपली ओळख आहे.अन तुमची डॉक्टर-इंजिनिअर अन पदवी हीच तुमची ओळख”
अशी आठवण आ.धीरज देशमुख यांनी या वेळी सांगितली!