
ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता ?, रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्ला!
देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ.” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिप्रश्न करत त्यांच्या कारकिर्दीवर प्रतिप्रश्न केला आहे.
रोहिणी खडसे ट्विट करत म्हणाल्या की “भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही.” अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी निशाणा साधला आहे!