
काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठे लपले? ; बाळसाहेब थोरात कडाडले
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे; गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचे कौटुंबिक बजेट कोलमडले आहे. देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई झाली आहे इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी खतांच्या किमती मध्ये सुद्धा वाढ करण्यात आली होती. देशांमधील जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्रातील सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त काँग्रेसने आज कार्यक्रम घेऊन भाजप सरकारची पोलखोल केली आहे यानिमित्त बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की”
“भाजपनं दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची आठवण करुन दिली. भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. काळा पैसा भारतात आणणार असं म्हटलं होत, ही आश्वासन पूर्ण झाली नसल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे”.
पेट्रोल ने सेंचुरी मारली आहे गॅस सिलिंडर ची सुद्धा मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. मात्र काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठे लपुन बसले आहेत असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.