केव्हा संपणार कुंभ राशीची शनी साडेसाती? आणि साडेसातीदरम्यान शनिदेवांना कस प्रसन्न कराव

0

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीला दर ३० वर्षांनी साडेसाती लागते. ही साडेसाती साडे सात वर्ष चालते. या काळात लोकांना काही शुभ तसेच अशुभ फळे जाणवतात. मानसिक त्रास, धन हानी, आजार इ स्वरुपात त्रास जाणवतात तर मान, धनयोग, प्रवासयोग, इ स्वरुपात शुभ लक्षणे दिसतात. साडे सातीचे तीन टप्पे असून प्रत्येक टप्प्यात वेगळी फळे जाणवतात.

सध्या कुंभ राशीला साडेसाती सुरू असून या राशीला साडेसातीचा प्रथम टप्पा सुरू आहे. कुंभेची साडेसाती संपायला अजून सहा वर्षांचा अवधि आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनी २९ एप्रिल २०२२ मध्ये कुंभ राशीत गोचर करत आहे. परिणामी या लोकांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. राशीत शनीने प्रवेश केल्याने कुंभेचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो. मकर राशीलाही याचा परिणाम जाणवेल. तसेच धनु राशीची साडेसाती संपेल व मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल.

कुंभ राशीच्या लोकांना ३ जून २०२७ रोजी शनी साडेसातीपासून मोक्ष मिळेल. परंतु २० आॅक्टोबर रोजी शनी मीन राशीत संक्रमण करेल अशा परिस्थितीत कुंभ राशीच्या काही लोकांची साडेसाती २३ फेब्रुवारी २०२८ रोजी संपेल.

शनिदेवांना प्रसन्न करण्याचे मार्ग
साडेसातीदरम्यान शनी मारुतीची उपासना करावी. या काळात शिवलिंगाची पूजा केल्याने शनी दोषांपासून मुक्ती मिळते. पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. शनिवारी तसेच दर अमावस्येला तेल दान केल्याने शनी साडेसातीचा प्रकोप कमी होतो. शनी स्तोत्र म्हणावे. शनिवारी लोखंडी भांडी, काळे कापड, काळे उडीद, मोहरीचे तेल आणि काळे तीळ दान केल्यासही शनिदेव प्रसन्न होतात. असा समज रूढ आहे.
वरील माहितीच्या अचूकतेसाठी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. माहिती आवडल्यास पेजला लाईक करा. लेख शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.