जेव्हा आईच्या आठवणींनी शरद पवारांचे डोळे आले भरून

0

देशाच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेते अशी आज शरद पवार यांची ओळख आहे. पवारांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली ५० वर्षे फिरत राहिले आहे आणि आजही फिरते आहे. म्हणूनच शरद पवार यांना जाणून घेण्याची उत्सुकता ताणली जाते आणि त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले जातात.

परंतु, या कणखर नेतृत्वाचा पाया बांधणे हे काही सोपे काम नव्हते. त्यासाठी मोठे कष्ट आणि त्याग करावे लागतात. आणि शरद पवार यांच्या आयुष्यात हा पाया रचला तो त्यांच्या आईने अर्थात शारदाबाई पवार यांनी.

अगदी ग्रामीण भागातून राजकारण व समाजकारण करत त्यांनी थेट दिल्ली गाठली. या एवढ्या मोठ्या काळात कधीही हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचे बाळकडू पवार यांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. अशा या कर्तृत्वान माऊलीचे स्मरण शरद पवार यांनी एक भावनिक पत्र लिहित केले आहे.

शरद पवार आपल्याला आईला ‘बाई’ या नावाने हाक मारायचे. त्याच नावाने साद घालत शरद पवार यांनी आपल्या भावनांना पत्राद्वारे वाट मोकळी करून दिली आहे. शरद पवार यांनी बाईंशी या पत्रातून संवाद साधला आहे. हे पत्र लिहिताना पवार काहीसे हळवे झाल्याचे पाहायला मिळाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.