ज्यावेळी लोक मला शिव्या देत होते, त्यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेता केले !

0

महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चांगलीच चलती आहे. महाराष्ट्रभरात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.त्यांची वक्तृत्व शैली चांगलीच सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र त्यांच्या आयुष्यात पण खच खळगे आले त्यांची पण काळाने कसोटी पाहीली आणि आज ते खंबीरपणे बीड जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून उभा आहेत.

वाढदिवसाच्या निमित्ताने बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले की “मला इथपर्यंत पाठविण्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या आहेत, याची मला जाणीव आहे. ज्या काळात लोक मला शिव्या देत होते, त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेतेपद दिले, हे मी कधीही विसरणार नाही, शब्दांत आपल्या भावना अभिष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केल्या.

धनंजय मुंडे म्हणाले की, “मी राजकारण करत गेलो. अनेक सहकारी सोबत आले, मला नेता म्हणायला लागले. आमच्या राजकारणात प्रामाणिकपणा आहे; म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले. अनेक निवडणुका लढलो आणि पडलोपण. पण, भविष्यात प्रत्येक निवडणूक जिंकणार आहे. तुमच्या विश्वासाने कोरोना काळात जिवंत ठेवले. समाजकारणात राजकारण केले नाही, समाजकारणच केले. पण, ‘समय के साथ बदलना होता है!’ काही जण म्हणाले, मी मनात राजकारण आणले नव्हते. पण, आता आणणार आहे, हे मी जन्मादिवशी ठरवले आहे. सत्तेच्या राजकारणात ज्याचा दोष नाही, त्याला दोष दिला जातो. हे माझ्या बाबतीत घडले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या मनामध्ये भूतकाळातील आठवणी अजून ताज्या असल्याचे दिसून आले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.