
जगातील सर्वात पूजनीय युध्द म्हणजे महाभारत होय. महाभारत कौरव आणि पांडव यांच्यादरम्यान झाले. महाभारतात कौरवांच्या दिशेने ११ अक्षौहिणी सैन्य होते तर पांडवांच्या वतीने ७ अक्षौहिणी सैन्य सहभागी होते. महाभारताचे युध्द १८ दिवस चालले ज्यात पांडवांचा विजय झाला. या युद्धाचे वर्णन अनेक पुराणात केलेले आहे. या युद्धात अनेक नामांकीत योद्धा सहभागी झाले होते. या सर्व युध्दमय परिस्थितीत या वीर योध्दयांच्या भोजनाची व्यवस्था कोणी केली आणि ५० लाखापेक्षा जास्त सैन्याच्या भोजनाचे व्यवस्थापन कोणी केल हेच आज आपण पाहणार आहोत
महाभारताच्या या युद्धात एक दक्षिणेकडील राज्य युध्दापासून विलग राहिल, पांडव आणि कौरव या दोहोंनी त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु दक्षिणेकडील उडपी या राज्याचा राजा याने भोजनाचा प्रश्न उपस्थित केला व या सर्व योध्दयांच्या भोजनाचे व्यवस्थापन स्विकारले. १८ दिवस चाललेल्या या युद्धात सर्वांना तृप्त करणारे भोजन मिळत व अन्नाचा एकही कण वाया जात नव्हता. अगदी आज किती सैन्य मारल जाईल याचा अंदाज आधीच उडपी नरेशला असा लागतो व त्यानुसार तो भोजन व्यवस्था करतो, परिणामी अन्नाचा एकही कण वाया जात नाही. या सर्व व्यवस्थापन प्रक्रियेचे सर्वांना आश्चर्य वाटत होत.
१८ दिवस झाले आणि पांडवांनी युध्द जिंकले. पांडवांचा राज्याभिषेक सुरू झाला. दरम्यान युधिष्ठिर उडपी नरेशला म्हणाला, ज्याप्रमाणे कमी सैन्य असून पांडवांनी युध्द जिंकले म्हणून वडील बंधू, गुरू द्रोण तसेच इतर आमच कौतुक करत आहेत. तुमचे भोजन व्यवस्थापन कौतुकास पात्र आहे. तुम्हाला किती सैन्य आज मरणार याचा आधीच अंदाज लागून तुम्ही भोजन बनवत होता. परिणामी अन्न वाया जात नव्हत. यावर उडपी नरेशन सांगितल, ही सर्व भगवान श्रीकृष्ण यांची कृपा. भगवान श्रीकृष्ण रोज रात्री शेंगदाणे खात असत जे त्यांना छावणीत मोजून दिले जात आणि त्यांनी खाल्ल्यानंतरही मोजले जात, जेवढे शेंगदाणे भगवान श्रीकृष्ण खात त्याच्या हजारपट सैन्य समाप्त होत असे. म्हणजेच श्रीकृष्णांनी ५० शेंगदाणे खाल्ले तर ५०००० सैन्य समाप्त होत असे. यानुसार रणभूमीचा अंदाज लावून भोजन व्यवस्था केली जात असे.