वासुदेव बळवंत फडकेंना स्वामींनी काय दिला संकेत? हे बघा नाव

श्री स्वामी समर्थ स्वामी संकेत माना यशाला गवसणी घाला.

0

स्वामी निरंतर प्रत्येक घटनेचे संकेत स्वताच्या भक्तांना देत असतात.परंतु ते समजून घेण्यासाठी मन नेहमी शांत ठेवावे लागते.असाच एक संकेत स्वामींनी महान स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांना दिला होता.

वासुदेव बळवंत फडके हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अजरामर नाव आहे.त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील शिरढोण या गावी झाला.वासुदेव बळवंत फडके अनन्य दत्त उपासक होते.त्यांनी या उपासना व भक्तीतून दत्त महात्म्य हा ७००० ओव्यांचा ग्रंथ लिहिला.ते नेहमी म्हणत,”दधिची ऋषींनी स्वताच्या अस्थिही देवासाठी दिल्या.मग हे भारतीयांनो मी माझा प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?” मात्र भाषण किंवा व्याख्याने देऊन इंग्रज सरकार हा देश सोडणार नाहीत तर त्यासाठी हातात शस्त्र घ्यावे लागेल.याप्रकारे हातात शस्त्र घेऊन सशस्त्र क्रांती करणारे आद्य प्रवर्तक म्हणून वासुदेव बळवंत फडके ओळखले जातात.त्यांची स्वामींवर खुप श्रध्दा होती.इंग्रज सरकारविरूध्द बंड करायच असेल तर स्वामींचा आशिर्वाद मिळाल्यास यश नक्की मिळेल असा संकल्प मनात धरून त्यांनी साधारण तीन ते चार वेळा गुप्त पध्दतीने स्वताचा मनोदय स्वामींना कळवला.परंतु स्वामी प्रतिसाद देत नव्हते.

स्वामी प्रतिसाद का देत नाहीत ते वासुदेव बळवंत फडकेंना कळत नव्हते.शेवटी एकेदिवशी स्वामी दरबारात असताना वासुदेव बळवंत फडके तेथे गेले आणि स्वताची तलवार स्वामी चरणांवर ठेवली तसेच मनोमन प्रार्थना केली.”स्वामींनी जर ही तलवार माझ्या हाती दिली तर माझा विजय निश्चित आहे.परंतु स्वामी महाराजांना भविष्यातील संभावना समजत होती.म्हणून त्यांनी तेथील एका सेवेकरीस हाक मारली व सांगितल,”अरे ही तलवार घेऊन त्या तरवडीच्या झाडावर टाकून दे.”स्वामी आज्ञेनुसार सेवकरीने तलवार फेकून दिली.वासुदेव बळवंत फडके नाराज झाले व स्वताची तलवार घेऊन माघारी आले.

वासुदेव बळवंत फडकेंनी नियोजित कार्य केले,परंतु स्वामी संकेतानुसार त्यात त्यांना अपयश आले.थोडक्यात स्वामी संकेत नेहमीच पुढील संभावना दर्शवित असतात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.