कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल?

0

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण गतीने सुरू असून काही लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १० कोटी असून लसीचा दुसरा डोस घेणारे जेमतेम २ कोटी लोक आहेत.लसीचा दुसरा डोस घ्यायला लोक टाळाटाळ करताना दिसून येत आहेत.काहीजण नाव नोंदवूनदेखील लसीचा दुसरा डोस टोचून घेत नाही आहेत.पहिला डोस आणि दुसरा डोस यात सामान्यत: ३०ते ४५ दिवसांच अंतर असण्याची गरज असून त्यानुसारच लसीकरण केले जात आहे.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही लोकांत डोकेदुखी,अशक्तपणा,ताप असे तात्पुरते साईड इफेक्ट जाणवलेले दिसून आल आहे.त्यातच लसीकरण केल तरीदेखील कोरोना संसर्ग होऊ शकतो अशा निष्कर्षान लोक गाफिल झाली आहेत.काही लोक एकच डोस पुरेसा आहे असा गैरसमज करून बसली आहेत.तसेच दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल असा प्रश्न विचारत आहेत.याप्रकरणी शासन आपली जबाबदारी निभावत असताना नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी करत दुसरा डोस घ्यावा.

जर एखादी लस ९४ टक्के प्रभावी असेल तर पहिल्या डोसमध्ये तीचा इफेक्ट ६०टक्के होतो,परंतु तुम्ही दुसरा डोस घेतला नाही तर पहिल्या डोसचा परिणाम शून्य होतो.डोस शरीरात जाऊन रोगप्रतिकारक यंत्रणा विकसित करण्यासाठी आवश्यक ते प्रमाण आवश्यक त्या गॅपन घेण जरुरी आहे.तसेच लसीचे हे दोन डोस घेताना पहिल्या लसीचा डोस ज्या कंपनीचा घेतला त्याच कंपनीचा दुसरा डोस घ्यावा लागेल,कारण प्रत्येक लसीचा परिणाम तसेच डोसची तिव्रता निराळी असते.सध्या राज्यातील सर्व तज्ञ डॉक्टरांनी लसीचे दोन्ही डोस घेण आवश्यक असल्याच स्पष्ट केल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.