ऑक्सिजन म्हणजे नेमकं काय?

0

सध्या जिकडे तिकडे ऑक्सिजन बद्दल विचारणा होत आहे. ऑक्सिजन शब्द दिवसात एकदा ऐकला, उच्चारला नाही असे होत नाही. आपले आणि ऑक्सिजनचे नाते श्वासा श्वासाशि जोडलेले आहे. ऑक्सिजन ला मराठी मध्ये प्राणवायू असे म्हणले जाते.

ऑक्सिजन निर्मितीचे, त्यांची ओळख करून देणे अशा गोष्टींचे श्रेय जाते प्रसिद्ध वैज्ञानिक प्रीस्टले (Joseph Priestley) यांना जातो. त्यांनी गॅसचा/वायूचा शोध लावला. त्यांच्या याच शोधामुळे आज आपण मस्त कोक सारख्या डबाबंद पेय पदार्थांचे सेवन आरामात करू शकतो; मात्र या भविष्याची त्यांना तुसभर पण कल्पना नसावी. खरं म्हणजे ऑक्सिजन चा शोध वैज्ञानिक शिले यांनी अगोदर लावला पण त्याची नोंदणी मात्र उशिरा केली. प्रिस्टले यांनी दोन वर्ष उशिरा शोध लावला पण नोंदणी लवकर केली म्हणून याचे योगदान साहजिक प्रिस्टले यांच्या नावावर जाते. म्हणजे आळशी असल्याचा तोटा किती होऊ शकतो तर एक इतिहास नावावर झाला असता, मात्र तो इतर कोणाच्या नावावर आळस असल्याने गेला!

अधातू मूलद्रव्य म्हणून ऑक्सिजनला ओळखले जाते. पृथ्वी वर २१% प्रमाणात ऑक्सिजन आढळून येतो. प्राण्यांच्या जीवनसाथी आवश्यक असल्याने यास प्राणवायू असे सुद्धा म्हणले जाते. त्याची रासायनिक सज्ञा ही O असून त्याच्या एका रेणू मध्ये २ अणु असतात. त्याचा अवर्तसारणी मध्ये ८ क्रमानं आहे. सोपे म्हणजे पाणी आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या पासून ऑक्सिजन निर्माण होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.