व्हिटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे काय होते ?

0

शरीराला अनेक प्रकारचे व्हिटामिन तसेच, प्रोटॉन, मिनरल्स यांची गरज असते. या सर्व घटकांमुळे शरीराचे पोषण होते. शरीर सुदृढ तसेच निरोगी राहावे यासाठी सकस आहार तसेच व्यायाम यांची गरज असते. अशाच पोषक घटकांमध्ये बी१२ याचा समावेश असून बी १२ च्या अभावामुळे खालील समस्या निर्माण होतात.

१) मेंदू आणि मज्जासंस्थेचे कार्य बिघडते, परिणामी विस्मरण, निद्रानाश, नैराश्य या समस्या येतात.
२) सतत तोंड येण, तोंडाला आतून फोड येण.
३) स्मरणशक्ती कमजोर होण.
४) खाण्यावरची इच्छा उडणे, भूक न लागणे.
५) सुस्त वाटण, चिडचिडेपणा वाढण, श्वास घ्यायला त्रास होण.
६) स्पर्श ज्ञान कमी होत, थंड, गरम संवेदना होत नाहीत बधिर वाटण.
७) थकवा येण, दृष्टी कमजोर होण, थोड काम केल तरी चक्कर येण.

व्हिटामिन बी१२ च्या कमतरतेमुळे वरील समस्या आढळून येतात. परिणामी अशा समस्या आढळल्यास तज्ञांचा सल्ला घेऊन सकस आहार व पोषण वाढवावे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.