काय आहेत थायरॉईडची लक्षणे?

0

थायरॉईडची समस्या सर्वसाधारणपणे आहारात आयोडिनची कमतरता असल्यास निर्माण होते. थायरॉईडची समस्या स्त्रियांमध्ये आढळून येते. थायरॉईड हे गळ्याच्या खालच्या बाजूला दिसायला फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असतात. जे चयापचय गती नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करण्याचे कार्य करतात.

थायराॅईडमध्ये बहुतांशवेळा वजन वाढण्याची समस्या दिसून येते. तुम्हाला कधीही आणि काहिही खाण्याची सवय असल्यास ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, परिणामी थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन थायरॉईड समस्या निर्माण होतात. आहारात आयोडिन नसल्यास थायरॉईड समस्या निर्माण होतात. थायरॉईड होण्यापूर्वी काही लक्षणे दिसून येतात. ज्यात काहीवेळा झपाट्याने वजन वाढते किंवा उतरते. अशीच काही लक्षणे आज आपण समजून घेणार आहोत.
१) थायरॉईड विकार होण्याआधी मानेला सूज येते. किंवा घशात जळजळ होते.
२) थायरॉईड विकार जडण्यापूर्वी अस्वस्थ वाटते. चिडचिड होते.
३) केस गळायला लागतात.
४) वजन झपाट्याने कमी होते किंवा वाढते.
५) हायपोथायरॉडिझम असलेल्या लोकांना थंडी जास्त वाजते, घाम येतो.
६) स्त्रियांत मासिक पाळी अनियमित होते.
७) चेहर्यावर सूज येते.
८) थायरॉईड होण्यापूर्वी प्रतिकारशक्ती कमी होते.

थायरॉईड विकार सर्वसामान्यपणे योग्य वेळेत डॉक्टरी इलाज केल्यास बरा होतो. आहारात योग्य प्रमाणात आयोडीनयुक्त मिठाचा वापर केल्यास थायराॅईड समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी असते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.